मराठी बातम्या

  1. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. हा मार्ग 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग' म्हणून ओळखला जाईल, अशी माहिती राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
  2. केंद्र सरकारने आणलेलं नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संविधान विरोधी आहे. त्यामुळे जे योग्य आहे, त्यालाच पाठिंबा द्यावा ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपण या विधेयकाला पाठिंबा दिला तर हे विधेयक सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही. कोर्टालाच या विधेयकाबाबतचा निर्णय घ्यावा लागेल, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी सांगितलं. यावेळी चिदंबरम यांनी विधेयकावर चार प्रश्नही उपस्थित केले.
  3. देशातील अनेक भागात या विधेयकाला विरोध होत आहे. विरोध करणारेही देशाचे नागरिक आहेत. आमचाही या विधेयकाला विरोध असून आम्हाला कुणाच्या देशभक्तीच्या प्रमाणपत्राची गरज नाही. आम्ही किती कट्टर हिंदू आहोत, याचंही प्रमाणपत्र आम्हाला द्यायची गरज नाही, असं सांगतानाच तुम्ही ज्या शाळेत शिकत आहात. त्या शाळेचे आम्ही हेडमास्तर आहोत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आमचे हेडमास्तर होते. अटलबिहारी वाजपेयी आणि श्यामाप्रसाद मुखर्जीही आमचे हेडमास्तर होते, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला.
  4. 'गोपीनाथ मुंडे हे आज असते तर माझ्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यावर अन्याय झाला नसता', अशी खंत भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मेळाव्यासाठी भगवान गडावर जात असताना खडसे यांनी मुक्ताईनगरात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
  5. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून आसाममध्ये निदर्शने सुरू आहेत. आंदोलनाची धार अधिकाधिक तीव्र होत आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं जम्मू-काश्मीरमध्ये तैनात निमलष्करी जवानांना पाचारण केलं आहे. या जवानांना आसाममध्ये पाठवण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये तैनात सीआरपीएफच्या दहा तुकड्या आसाममध्ये पाठवण्यात येत आहेत.
  6. वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन याला वगळण्यात आलं आहे. दुखापतीनं ग्रस्त असलेल्या शिखरच्या जागी मयांक अग्रवालला संधी देण्यात आली आहे.
  7. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (इस्रो) श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून आज, बुधवारी 'रिसॅट २ बीआर १' या भारतीय उपग्रहाचं प्रक्षेपण केलं. पीएसएलव्ही - सी ४८च्या माध्यमातून हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. या उपग्रहासह इस्रायल, इटली, जपान आणि अमेरिका या देशांचे एकूण नऊ उपग्रह अवकाशात पाठवण्यात आले आहेत.
  8. भरतपुरचे तत्कालीन महाराज सूरजमल यांची व्यक्तिरेखा चुकीच्या पद्धतीने दाखवली म्हणून जाट समूदायाने सिनेमाचा कडाडून विरोध केला. समुदायाच्या नेत्यांनी सोमवारी सरकारला निवेदन पाठवलं होतं.
  9. प्रिमिअम डिव्हाइस बनवणारी कंपनी अशी Apple ची ओळख आहे. अॅपलकडे एकाहून एक सरस प्रोडक्ट आहेत जे इतर कंपन्यांच्या तुनलेत महागडेही आहेत. अॅपलचं नवं उत्पादन मॅक प्रो कॉम्प्युटरची किंमत ५९,००० डॉलर्स म्हणजे सुमारे ४० लाख रुपये आहे. अॅपलचा हा मॅक प्रो एलन मस्कच्या टेस्ला मॉडेल ३ गाडीपेक्षाही महाग आहे. कंपनीने अमेरिकेत याची डिलिव्हरीदेखील सुरू केली आहे.