दिवाळी सोहळा

दिवाळी सोहळा

दिवाळी हा सण आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा असतो. फटाक्यानची आतिषबाजी आणि फराळाचे आस्वाद घेणे, व आपल्या आप्तीष्ट्यांना भेटणे हे ह्या सणाचं महत्व आहे. अर्थातच हजारो मैल उत्सव स्थळा पासन लांब असल्या मुळे, आपल्याला डेन्मार्क मधे छोट्या प्रमाणावर हा सण साजरा करावा लागतो. सुदैवाने मराठी समाज एकत्र येऊन हा सण गेले अनेक वर्ष इथे साजरा करीत आहे.

तर नेहेमी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आपण जास्तीत जास्त संख्येने एकत्र येऊन हा सण साजरा करूया. कलाकृती च सादरीकरण आणि सगळ्यांशी आपुलकीची भेट हे आपल्या कार्यच मुख्य उद्द्येश आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा वेळ जशी जवळ येईल तशी ठरेलच, पण आत्ताच्या घडीला ह्या कलाकृतीन करता आपला सहभाग कार्यकारी समितीला अवश्य कळवावे.

  • निवेदन
  • गाणी
  • नाच
  • नाट्य
  • फराळ प्रदर्शन
  • संगीत प्रणाली ऑपरेटर
  • स्वयंसेवक – कुठल्याही कामासाठी

Date

10 October 2018

Tags

2018